मराठा साम्राज्यविषयी थोडक्यात माहिती

◆ मराठा साम्राज्य 

मराठा साम्राज्य उभे करण्यासाठी काय महत्त्वाचे ठरले ?

बहमनी सत्ता विभाजन झाल्यामुळे पाच शहा मध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि त्याचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठा राज्य उभे केले पण संघर्ष होता त्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिले आणि एक शक्तीशाली ,मजबूत असे मराठा राज्य उभे राहिले त्यांसाठी खूप संघर्ष करावा लागला.त्यानंतर त्याच्या आई म्हणजेच जिजाबाई यांच्या म्हणण्यानुसार  इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वतंत्र मराठा साम्राज्याचे पाहिले छत्रपती बनले. आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक झाले.इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते.


भगवा ध्वज
मराठा साम्राज्याचा झेंडा

शहाजीराजे आणि माँ जिजाऊ याचे मराठा सम्राज्यासाठी मोठे योगदान

      मराठा साम्राज्य होण्यासाठी शहाजी राजे आणि माँ जिजाऊ साहेब यांचा फार मोठा वाटा आहे. शहाजी राजे यांनी दुसऱ्याची जहागिरी केली पण ते आपल्या लोकांसाठी काहीही करू शकत नव्हते . दुसऱ्याची चाकरी करून कधीही आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही त्यासाठी  हवे आपले स्वराज्य . स्वराज्य होण्यासाठी शहाजी राजे यांनी ही प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाही . शहाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि राजमाता जिजाऊ यांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालवण्यासाठी पाठवले आणि त्यांचा सोबत  मोठे मातब्बर सैनिक सुध्दा पाठवले आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ विवाह झाले होते याचे कारण म्हणजे आठ मातब्बर घराणे एकत्र आल्यामुळे त्यांची ताकत वाढली . तसेच राजमाता जिजाऊ यांनी प्रत्येक प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे मार्गदर्शन केले.

मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला ?

         छत्रपती शिवाजी महाराजांनी इस १६४३ ला पहिला किल्ला तोरणा घेतला तो फक्त वयाचा  १६ व्या  वर्षी आणि मराठा साम्राज्याचा उदय झाला.त्यानंतर त्यांनी आपल्या बुद्धीने आणि गनिमी.…कावा करून आपले स्वराज्य मोठे केले. स्वराज्यात रयत गुलामगिरी मध्ये नाही तर स्वतंत्र अशी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी अवघ्या ९ वर्षात  मराठा साम्राज्यच्या सीमा विस्तार केला . पण नंतर फितूरी करून त्यांना पकडले आणि त्याची हत्या केली.त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजानी आणि विश्वासु सरदार धनाजी आणि संताजी अशा वीर योध्याने स्वराज्य टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला.छत्रपती राजाराम राजे याच्या मृत्यू नंतर राणी ताराबाई यांनी कणखर भूमिका बजावली आणि मोघलांना सरो की पळो अशी अवस्था केली पण औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बहादूर शाह ने छत्रपती शाहू महाराजांना कैदेतून सोडून दिले त्यानंतर  ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात युद्ध संघर्ष सुरू झाला छत्रपती शाहू महाराज हे बाळाजी विश्वनाथ च्या मदतीने हे युद्ध जिंकला आणि राज्य टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले.
                शाहू महाराज यांच्या उत्तरकाळात छत्रपती हे नामधारी बनले आणि पेशवाईचा उदय झाला.आणि त्यानंतर बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,नानासाहेब पेशवे यांनी मराठा साम्राज्य वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले.दुसरा बाजीराव याच्या चुकीच्या धोरणामुळे इंग्रज सरकारनेचे अस्तित्व वाढले त्यानंतर याच इंग्रजांनी दुसरा बाजीराव याला तिसऱ्या युद्धात पराभूत करून मराठा साम्राज्यावर इंग्रज सत्ता स्थापन करण्यात आली.

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):