छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांच्या विषयी माहिती ! मालोजी राजे भोसले व विठोजीराजे भोसले यांच्या विषयी माहिती

 मालोजी राजे भोसले & विठोजी राजे भोसले

 मित्रानो या लेखामध्ये आपण भोसले घराण्यातील आणखीन शूरवीरांची म्हणजेच मालोजीराजे भोसले आणि त्यांचे भाऊ विठोजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती सांगणार आहोत चला तर सुरू करूया 


मालोजी राजे भोसले व विठोजीराजे भोसले यांच्या विषयी माहिती
मालोजी राजे भोसले व विठोजीराजे भोसले यांच्या विषयी माहिती

      मालोजीराजे आणि विठोजी राजे यांचा थोडक्यात परिचय :-

 मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांचे वडील बाबाजी राजे भोसले . मालोजी राजे मोठे होते आणि विठोजी राजे लहान होते . मालोजी राजे यांचा जन्म इ.स.१५५० झाला व विठोजी राजे यांचा जन्म १५५३ ला झाला आणि त्यांच्या जन्माचे ठिकाण वेरूळ. मालोजी राजे आणि विठोजी राजे मोठे कर्तबगार होते . छत्रपती शिवाजी महाराज यांचे  मालोजी राजे आजोबा आणि विठोजी राजे चुलत आजोबा आहेत . 


मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी कार्य व पराक्रम:-

        मालोजी राजे आणि विठोजी राजे यांनी १६ व्या शतकात छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील  वेरूळ लेण्याजवळ घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.हे मंदिर खूप प्राचीन आहे व १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. मालोजी राजे भोसले फलटणचे  देशमुख घराण्यातील दिपाबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांचा भाऊ जगपालराव निंबाळकर . इ.स. १५८८-१५८९ मध्ये कोल्हापूर मध्ये लढाईत मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी मोठा पराक्रम गाजवला.त्यामुळे  दोन्ही भावांवर खुश होऊन बुऱ्हाण निजमशहाने दीड हजारची बढती केली . मालोजीराजे यांचे वय फक्त १४ते १५ वर्षाचे होते.इ.स.१५९१ ते १९९५ आदिलशाही व निजामशाही मध्ये युद्ध झाले त्यामध्ये मालोजीराजे यांनी खूप पराक्रम गाजवला ते तेव्हा निजामशाही मध्ये होते.या कारणामुळे त्यांच्या सरंजाम ५ हजार पर्यंत वाढवून दिला. त्यामुळे सुप्या सारख्या प्रदेश मालोजीराजे यांच्या वाहिवाटीस आला. बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यू नंतर त्याच्यात आपसात संघर्ष सुरू झाला . मलिक अंबर आणि मिओन राजू आश्या सत्ता निर्माण झाल्या आणि त्यामध्ये संघर्ष सुरू झाला. मालोजीराजे राजे हे मलिक अंबर या गटामध्ये होते.  मलिक अंबर हे त्यावेळी इंदापूर परीसरात एका गढि मध्ये होता आणि त्यावेळी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्या युद्धात मालोजी राजे ठार झाले. त्या वेळी शहाजी राजे १-६ वर्षांचे होते. मालोजीराजे यांच्या मृत्यू नंतर जहागिरीचा संभाळ विठोजीराजे यांनी इ.स.१६११ पर्यंत त्यानंतरच्या काळात शहाजी राजे यांच्याकडे जहागिरीची जबाबदारी आली. इ.स. १६०५ मध्ये त्याकाळी शूर सरदार लखोजी जाधव यांच्या मुलीशी शहाजीराजे यांच्या  विवाह झाला म्हणजेच जिजाबाई सोबत. त्यांच्या विवाह दौलताबाद येथे झाला. त्यानंतर १ ते २ वर्षात विठोजी राजे यांनी शरीफजी राजे यांचा विवाह केला आणि विठोजी राजे यांचा मृत्यू १६१८ च्या पूर्वी झाला असावा .  विठोजी राजे भोसले यांना आठ मुले होते त्यांचे मुलाचे नावे पुढीलप्रमाणे संभाजी भोसले,खेलोजी भोसले, मल्लाजी भोसले,मंबाजी भोसले, नागोजी भोसले, परसोजी भोसले, त्र्यंबकजी भोसले , बकाजी भोसले. मालोजीराजे यांची समाधी वेरूळ लेण्याजवळ घृष्णेश्वर मंदिरा समोरील बाजूस आहे .

  प्रिय वाचकांनो तुम्हाला जर आमची पोस्ट आवडली असेल तर जरूर शेयर करा 

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):