छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा -shivrajyabhishek sohla


छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांवर होणारे अत्याचार सहन होत न्हवते किती दिवस दुसऱ्याची चाकरी करणार त्यामुळे लोकांवर होणारे अन्याय थांबणार नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्याची शपथ घेतली यासाठी खूप संकटे आली पण शेवटी स्वराज्य स्थापन झाले.आणि त्यानंतर त्यांचा राज्यभिषेक झाला .प्रिय वाचकांनो मी तुम्हाला राज्याभिषेक याविषयी माहिती देणार आहे


शिवराज्याभिषेक सोहळा-shivrajyabhishek

 

शिवराज्याभिषेक का केला?

      शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मोठ्या संकटे आली,पण शिवाजी महाराज कधी मागे हटले नाही त्यांनी मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने त्यावर मात करत स्वराज्य स्थापन केले पण तरीही काही जण अजूनही स्वतंत्र राज्याचा राजा  मानत नसत आणि एक बंडखोर राजा म्हणत.त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी दिलेला (आदेश, हुकुम,त्यांची स्वक्षरी, त्यांचे पत्र, शिका, जमीन घेणे वैगरे) हे रयत /राजसत्ता गांभीर्याने घेईलच असे नव्हते.स्वराज्याला स्वतंत्र राज्य म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी आणि शिवाजी महाराज स्वराज्याचे अभिषिक्त राजे व्हावे यासाठीच राज्याभिषेक करण्यात आला.


राज्यभिषेकसाठी कोणता किल्ला निवडला, तो का आणि कोणती तयारी करून ठेवली?

राज्यभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी  रायगड हा किल्ला निवडला होता.  रायगड हा विशाल मजबूत किल्ला आहे.त्याचप्रमाणें हा डोगरराळ भागात आहे आणि त्यांच्या आजूबाजूला काही किल्ले आहेत त्यामुळे रायगड हा किल्ला सुरक्षित आहे.स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते.त्यामुळेच स्वराज्याची राजधानी म्हणून निवडले आणि शिवाजी महाराजांनी रायगड बांधणीचे काम हिरोजी इंदलकर त्यामध्ये राजमहाल, राण्यांचे आणि राजपुत्रचे महाल,मंत्राचे वाडे व इतर इमारतीचे काम त्याचप्रमाणे धान्याची कोठारे, बाजारपेठ, गजशाळा ,दारूची गोळ्याचे कोठारे, अंबरखाना, पाण्याचे तलाव आणि जगदीश्वराचे मंदिर उभारले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी येणाऱ्या पाहुण्याची पूर्ण तयारी करून ठेवली.

शिवराज्याभिषेक कोणी केला?

गागाभट्ट हे एक विद्वान पंडित होते आणि ते काशीत राहात. गागाभट्ट  हे मूळ पैठणचे होते.गागाभट्ट यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांनी केला.

शिवराज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळ कोणते?

१) प्रधान :-मोरोपंत त्रिंबक पिंगळे

२) अमात्य :-रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

३) सेनापती :-हंबीरराव मोहिते

४) पंडितराव :- रघुनाथराव पंडित

५) न्यायाधीश :-निराजी रावजी

६) सचिव  :-अण्णाजीपंत दत्तो

७) मंत्री  :-दत्ताजीपंत त्रिंबक वाकनीस

८) सुमंत :-रामचंद्र त्रिंबक डबीर


राज्याभिषेकाची सोहळ्याची तयारी ?

शिवाजी महाराजांचे तक्त सुवर्णाचे,बत्तीस मनाचे,मौल्यरत्न जडीत बनवले,सप्त महानद्यांची पानी, पवित्र नद्यांचे पानी,समुद्राचे पानी, तसेच पवित्र तीर्थक्षेत्रचे पानी आणले.सुवर्णाचे कलश बनवले आणि सुवर्णाचे तांबे बनवले.आठ तांबे व आठ कलश यांनी अष्टप्रधानानी अभिषेक करण्याचे ठरविले.आणि काही  विद्वान पंडित , सरदार ,कामदार, आणि वेगवेगळ्या देशात आमंत्रणे गेली.

राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी कोणती नव्याने सुरुवात केली?

शिवाजी महाराजांनी नवे शक किंवा कालगणना सुरु केली,शिवराई होन सोन्याचे व चांदीचे नाणेही तयार केले त्यावर "श्री राजा शिवछत्रपती" अशी अक्षरे आहेत.शेकडो वर्षांपासून चालत आलेली उर्दू व फारशी भाषा संस्कृत व मराठी भाषा नाहीशी होत चाललेली होती पण शिवाजी महाराजांनी पुन्हा व्यवहारात, पत्र व्यवहारात ,प्रचारात आणली.शिवाजी महाराजांनी काही ग्रंथ लिहण्यास सांगितले त्यामध्ये ("राज्यव्यवहारकोश"आणि "करणकौस्तूभ"). मराठी भाषेला राज्यभाषा करण्याचा प्रयत्न केला. मंत्राची फारशी भाषेतील नावे बदलून संस्कृत मध्ये करण्यात आली आणि त्यांना अष्टप्रधान असे संबोधले गेले. धर्मविषयक व न्यायविषयकनवीन कायदेही निर्माण केले. 

राज्याभिषेक सोहळा कसा संपन्न झाला ?

शिवराज्याभिषेक सोहळा हा २९ मे ते ६ जून पर्यत चालू होता ते पुढीलप्रमाणे.

●२९ मे = शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली तसेच तुलादान करण्यात आले त्यामध्ये(प्रथम सुवर्ण,चांदी, तांबे,मौल्यवान धातू,विविधप्रकारची फळे, आणि साखर)

●३० मे = पुन्हा शिवाजी महाराजांचे आपल्या राण्यासोबत विवाह करण्यात आले.

●३१ मे = या दिवशी ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त होता,त्यासाठी अग्निप्रतिष्ठा करण्यात आली आणि इंद्रायणीची पुजा करण्यात आली.

●१ जून =रोजी ग्रहयज्ञ करण्यात आला त्याचप्रमाणे नक्षत्रहोम हा विधीही करण्यात आला.

●२ जून = या दिवशी कोणत्याही मुहूर्त नसल्याने कोणताच विधी झाला नाही.

●३ जुन = रोजी नक्षत्रयज्ञ करण्यात आला.

●४ जून = या दिवशी निऋतिराग हा यज्ञ करण्यात आला.

●५ जून = हा समारंभाचा सातवा व महत्त्वाचा दिवस या दिवशी त्रियोदशीचा मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत मंगलविधी करण्यात आले,सभासदाने या सोहळ्याचे वर्णन बखरीत करून ठेवले आहे "सर्वाना नमन करून महाराज अभिषेकास सुवर्णचौवकीवर बसले त्यानंतर अष्टप्रधान मंडळ आणि थोर पंडितांनी जल अभिषेक केला, नंतर दिव्य वस्त्र,दिव्य अलंकार घेऊन सिहसनांवर बसले ,आणि छत्रपती झाले.

●६ जून = इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हा उपस्थित होता.आणि स्वतः वरील Oxiden’s Diary मध्ये नमूद केले आहे.तो लिहतो "या दिवशी राजा भव्य सिहसनांवर आरूढ झाला.संभाजी राजे ,पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राम्हण सिहसनांखाली ओट्यावर बसले होते. सिहसनांच्या दोन्ही बाजूस सुवर्ण भाल्याच्या टोकावर अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. उजव्या बाजूस दोन मोठमोठे दाताच्या मत्स्याची सुवर्णाची शिरे होती. आणि डाव्या बाजूस एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.या तीन प्रतिकावरून शिवाजी महाराजांचे सामर्थ्य स्पष्ट होते.त्याच बरोबर शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सिहसनांवर बसले. आणि एकच जयघोष सुरु होता छत्रपती शिवाजी महाराज की जय 

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):