स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती

 स्वराज्य संकल्पक- शहाजीराजे भोसले

मित्रांनो या लेखामध्ये आपण  स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले  यांच्या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.शहाजी राजे भोसले यांचे स्वराज्यासाठी खूप मोठे कार्य होते .सुरू करण्यापूर्वी  प्रथम स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना मनाचा मुजरा. 

 परिचय

शहाजी राजे यांच्या जन्म इस.१५९४ मध्ये झाला .त्यांचे वडील मालोजी राजे भोसले ,आई उमाबाई आणि त्यांच्या काकांचे नाव विठोजी राजे भोसले . प्रथम पत्नी जिजाबाई यांची दोन मुले छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी राजे भोसले आणि दुसरी पत्नी तुकाबाई यांची मुले व्यंकोजी भोसले,कोयाजी भोसले, संताजी भोसले


शाहजीराजे भोसले
शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांची मूर्ती


शहाजी राजे यांचे कार्य:-

मालोजी राजे आणि विठोजी राजे शहाजी राजे यांना घोडेस्वारी,युद्धकला ,लेखन , ढाल तलवार बाजी मध्ये परिपूर्ण केले. इस. १६०५ ला दोन मातब्बर घराणे भोसले- जाधव एकत्र आले म्हणजेच  शहाजी राजे व जिजाबाई यांचा विवाह थाटामाटात दौलताबाद येथे पार पडला. त्यावेळी लखोजीराव आणि विठोजीराजे हे दोन्ही निजामशाही मध्ये होते . मालोजीराजे यांच्या मृत्यू नंतर जहागिरीचा संभाळ विठोजीराजे यांनी इ.स.१६११ पर्यंत त्यानंतरच्या काळात शहाजी राजे यांच्याकडे जहागिरीची जबाबदारी आली. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. निजामशाही दरबारात शहाजी राजे यांना मोठा मान दिला जात.उत्तरेच्या मुघल बादशाने निजामशाही जिकण्याचा निर्णय घेतला तेव्हा विजापूरचा आदिलशाह सुद्धा त्याला मिळाला . अहमदनगर भातवडी च्या लढाई मध्ये मलिक अंबर आणि शहाजी राजे निकराने लढले आणि दोन्ही सेनेचा पराभव केला . या लढाईत शरीफजी राजे यांचा मृत्यू झाला. पण जो पराक्रम शहाजी राजे यांनी गाजवला त्यामुळे प्रतिष्ठा वाढली.त्यानंतर मलीक  अंबर ने राजकारण केले त्यामुळे शहाजी राजे यांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाहीत गेले. काही काळानंतर आदिलशहित सरलष्कर ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी निजामशाही मध्ये खुप काही घडामोडी घडल्या म्हणजे मालिक अंबर चा मृत्यू झाला आणि मोठा मुलगा गादीवर बसला पण तो कारस्थानी होता .आणि त्यामुळे निजामशाहीला उतरती कळा लागली आणि मोगलाचा स्वारीचा धोका निर्माण झाला त्यामुळे निजामशहाच्या आईने शहाजी राजे यांना पुन्हा निजामशाहीत येण्यासाठी साकडं घातल. आणि ते पुन्हा निजामशाही आले.पण निजामशाहीतील सर्व पुरुषांना ठार मारले गेले आदिलशकडून तेव्हा शहाजीराजे यांनीनिजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादिवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला  आणि त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. शहाजहान आणि आदिलशहा याने पुन्हा निजामशाहिवर आक्रमक केले आणि मुर्तझाला पकडले . शहाजीराजे यांनी दिलेल्या शब्द पाळला त्यांनी मुर्तझाला वाचवले आणि स्वतःआदिलशाहीत गेले. पण तिकडे शिवाजी महाराज किल्यावर किल्ले घेत होते त्यामुळे आदिलशहाने मुस्तफा खान व बाजी घोरपडे यांना पाठवून कर्नाटकात कैद केले. शहाजीराजे ला किती दिवस अटकेत ठेवावे मराठा सरदारांचा असंतोष निर्माण होत होता त्यामुळे कोंढाणा, बंगरुळ आणि कंदर्पी हे तीन किल्ले शिवाजी महाराज  आणि संभाजी महाराज यांनी द्यावे त्यानंतर शहाजी राजे यांची सुटका करण्यात येईल आणि तीनही किल्ले आदिलशहाच्या स्वाधीन केले त्यानंतर शहाजी राजे यांची सुटका झाली आणि ते पुन्हा कर्नाटकात येऊन त्यांचा दबदबा निर्माण झाला.


छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी राजे भेट
शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जेजुरीला भेट

      


   काही काळानंतर ते महाराष्ट्रात आले इस.१६६२ मध्ये शाहिस्तेखान याने छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी पुण्यात तळ ठोकून बसला होता त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे आणि शहाजी राजे याची भेट जेजुरीला झाली आणि काही काळ आपल्या पत्नी आणि मुलासोबत घालवलात्यांनतर पुन्हा जहागिरीत परतले. आणि काही कालांतराने म्हणजेच 23 जानेवारी १६६४ रोजी ते होदेगिरीच्या जंगलात शिकारी साठी गेले असता त्यांच्या घोड्याचा पाय एका वृक्षवेली मध्ये अडकला आणि शहाजीराजे घोड्याऊन पडले त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी राजे यांचे सावत्र भाऊ व्यकोजी राजे यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्यांची समाधी होदेगिरीच्या शिमोग्याजवळ बांधली. 

शहाजी राजे भोसले
शाहजीराजे भोसले यांचे समाधी स्थळ

स्वराज्य आणि शाहजीराजे याविषयी माहिती 

शहाजहानने शहाजी राजे यांना बंगरुळची जहागिरी दिली पण शहाजी राजे आदिलशाही मध्ये असताना निजामशाही चा प्रदेश म्हणजेच पुणे व त्याजवळील त्यांच्याकडेच ठेवला त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतंत्र राज्यकारभार चालण्यासाठी पाठवले आणि त्यांच्या सोबत काही चांगली पराक्रमी मावळे सुध्दा पाठवले एवढेच नाही तर त्यासाठी एक राजमुद्रा सुद्धा शहाजीराजे यांनी शिवरायांना दिली.आणि शिवरायांना शेवटपर्यंत पाठिबा दिला 

शिवाजी महाराजांचे वाढते स्वराज्य पाहून आदिलशहाने शहाजीराजे यांना कैद केले .पण त्यानंतर शिवाजी महाराजांनी राजकारण केले म्हणजेच त्यांनी शहाजहानला पत्र लिहिले माझे वडील शहाजी राजे आपली चाकरी करू इच्छितात याबतल्यात शहाजी राजे यांची सुटका करून घेतली, 

जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा शहाजी राजे यांनी स्वराज्यासाठी १७,००० सैन्य विजापूर बाहेर ठेवले होते..

शहाजी राजे यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी दोनदा अयशस्वी झाले ,पण त्यांच्या मदतीने शिवाजी महाराज हे स्वतंत्र राज्य निर्माण करू शकले त्यामुळेच शहाजी राजे भोसले यांना स्वराज्य संकल्पक असे म्हणले जाते.

शहाजीराजे यांनी कोणत्या  सत्ता सोबत काम केले ते जाणून घेऊ इ.स. प्रमाणे,
इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):