छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती | शिवपूत्र शंभूराजे


छत्रपती संभाजी महाराज (१६५७_१६८९)

जन्म:-  १४ मे १६५७ पुरंदर, पुणे(महाराष्ट्र) ,भारत
राज्य काळ:-  जानेवारी १६ (इस१६८१) – मार्च ११ (इस१६८९)
राज्याभिषेक:- १६, जनवरी १६८१, पन्हाळा
वडील:- छत्रपति शिवाजी राजे भोसले
आई:- सईबाई भोसले
भाऊ(सावत्र):- राजाराम राजे भोसले
पत्नी:-  येसुबाई राणी साहेब
मुले:-भवानी बाई, शाहू राजे
धर्म:- हिन्दू
मृत्यू:- ११ मार्च, इ.स. १६८९

समाधी:-वढू तुळापूर पुणे (महाराष्ट्र)


छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूर


प्रिय वाचकांनो छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य खूप मोलाचे होते तर चला तर मग त्यांच्या विषयी थोडक्यात माहिती बघू

◆वयाच्या ८ व्या वर्षी शंभूराजांच्या मिर्झाराजे यांनी ५००० ची मनसबदारी दिली.

◆वयाच्या ९ व्या वर्षी औरंगजेब यांच्या आग्रा कैदेतून सुटका.

◆वयाच्या १४ व्या वर्षी "बुधभूषण" संस्कृत भाषेत तर नखशिखांत, नायिकाभेद व्रज भाषेत लिखाण.

◆वयाच्या१५ व्या वर्षी संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली लढाई.

◆वयाच्या १७ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज झाले.काहि दिवसात जिजाबाई यांचे निधन झाले.

◆वयाच्या २२ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे आकस्मिक निधन झाले. पण हे संभाजी महाराजांना कळू दिले नाही तेव्हा ते पन्हाळा वर होते त्यामुळे ते अंत्यविधी साठी येऊ शकले नाही.याच काळात स्वराज्याचे पुढील छत्रपती कोण यामुळे खुप काही राजकारण झालं.

◆वयाच्या २३ व्या वर्षी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक...

◆राजमुद्रा:-

वश्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||वतर्ते कस्यनोपरि ||

अर्थ: शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालवते.

◆वयाच्या २३ ते ३२ व्या वर्षी स्वराज्याचा विस्तार पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून तेदक्षिण भारतात तंजावर पर्यंत . छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षात १२० पेक्षाही जास्त लढाया केल्या पण एकही हरले नाही.

◆वयाच्या ३२ व्या वर्षी स्वकीयांनी फितूरी करून औरंगजेब यांनी संभाजीराजे ना कैद केले, जे स्वराज्याच्या पाच पट सैन्य असलेल्या मोगलाला व औरंगजेबाला जमले नाही.ते एक गदार स्वकीयाने केले.स्वराज्यासाठी वयाच्या ३२ व्या वर्षी सतत ४० दिवस अगणित यातना सहन करत बलिदान...

◆जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट (बाणांपासून संरक्षण)ची निर्मिती...

◆तब्बल १६ भाषेंवर प्रभुत्व...

◆दक्षिण भारतातील सर्व शाह्यांना पराभूत करत स्वराज्यविस्तार...

◆एकाच वेळी औरंगजेबासह १६ आघाड्यांविरुद्ध विजयी सलामी...

◆३२ वर्षांच्या आयुष्यात एकही तह ना माघार नाही, अखंड अजिंक्य सलामी...

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):