स्वराज्य प्रेरीका- राजमाता जिजाऊ साहेब माहिती rajmata jijau infromation-marathawarriors

 स्वराज्य प्रेरीका- राजमाता जिजाऊ साहेब      (इ.स. १५९८ - २७ जून, इ.स. १६७४)


       राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराव जाधव त्या काळातील मातब्बर सरदार,त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाई यांच्या जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

Rajmata jijau
राजमाता जिजाऊ जन्मस्थान सिंदखेडराजा येथील सूंदर मूर्ती

   जाधव घराणे मातब्बर असल्याने जिजाबाई ह्या राजनीती व युद्धनीती मध्ये पारंगत होत्या. मालोजीराजे व लखोजीराव त्यांची चांगल्या मैत्रीतुन ते नातेवाईक झाले.त्या काळात लहानपणी लग्न करत असे त्यांमुळे जिजाबाई यांचा विवाह लहान असतांना झाला.शहाजीराजे व जिजाबाई यांचा विवाह इ. स.१६०५ ला दौलताबाद मध्ये थाटामाटात झाला. दोन मोठे घराणे एकत्र आल्याने  निजामशाही आणि आदिलशाहीत संशयाचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले त्यातूनच भोसले व जाधव घराण्यात वाद निर्माण झाला.त्याच वेळी उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले.विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजे यांचे जहागिरीत असलेले पुणे बेचिराख करून टाकले .त्यामुळे शहाजी राजे अडचणीत सापडले अशा परिस्थितीत जिजाबाईना सुखरूप ठिकाणी ठेवले पाहिजे कारण त्यावेळी जिजाबाई दोन महिन्यांच्या गरोदर होत्या त्यावेळी त्यानां शिवनेरी कडे घोड्यावर प्रवास करावा लागला. शिवनेरी किल्ला मजबूत होता तसेच किल्लेदार विजयराज त्यांचा नात्यातील होता.त्यानंतर काही काळानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.त्यांच्या मुलांची नावे त्यांचा थोरला मुलगा संभाजी राजे भोसले आणि दुसरा मुलगा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज . लहानपणी जिजाबाई शिवाजीराजे यांना महाभारत - रामायण आणि शूरवीरच्या प्रेरणादायी गोष्टी सांगत. त्यांनी निचय केला की शिवबा कोणाची चाकरी करणार नाही त्यांना माहीत होतं की लोकांची चाकरी करून होणारे अत्याचार जुलूम थांबणार नाही.

माँ जिजाऊ
राजमाता जिजाऊ यांची सुंदर मूर्ती -जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा


     काही दिवस जिजाबाई आणि शिवाजीराजे विजापूरला गेले तेव्हा शहाजीराजे आदिलशीत होते. तेथे त्यांना राजकारभार कसा चालतो आणि न्याय निवाडे कसे होतात  यांची माहिती व्हावी म्हणून त्यांना आदिलशाहीत नेले असावे . काही दिवस बंगरुळूलाही नेले.त्यानंतर पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते . त्याचबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.शिवाजी राजे यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पुणे विकास केला. पुण्यात शिवाजीराजे ना शिक्षण देण्याची सुरवात केली. जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराजे गावागावात जात व लोकांच्या अडचणी एकूण  त्यावर मार्ग काढत.त्यामुळे जिवलग मित्र मिळाले. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचा उदय झाला . त्या वेळी जिजाबाई ह्या शिवाजी राजे यांच्या गुरुचे काम करत होत्या. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, जिजाबाई स्वतः राज्यव्यवस्था यांची जबाबदारी पार पाडत आणि स्वतः सदरेवर बसून लोकांचे भांडणं मिटवत. आता शिवाजी महाराज यांचे राज्य कारभार सुरळीत चालू होता. त्यावेळी जिजाबाईंनी राज्याभिषेक करण्याचे ठरविले . आणि राज्यभिषेकाची तयारी झाली आणि गागाभट्ट यांनी तो गेला .आणि स्वतंत्र राज्य प्रस्थापित झाले. शिवाजी महाराज यांचा नावलौकिक सर्वत्र झाला .
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व स्वतंत्र स्वराज्याची स्थापना झाल्यावर  जिजाबाई यांनी बारा दिवसांनतंर  १७ जून, इ.स. १६७४ ला शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आणि त्यांची समाधी पाचाड(रायगड)येथे आहे

जिजाबाई शाहजी भोसले
राजमाता जिजाऊ समाधी स्थळ पाचाड(रायगड)


राजमाता माँ जिजाऊ यांना आमच्याकडून मानाचा मुजरा  
          जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):