छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगोदर महाराष्ट्रावर असलेल्या राजाच्या सत्ता (प्राचीन व मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास)

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगोदर महाराष्ट्रावर असलेल्या राजाच्या सत्ता  (प्राचीन व  मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास)

     माझ्या प्रिय वाचकांनो आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगोदर असलेले राजवंश आणि राजांची माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया प्राचीन व मध्ययुगीन इतिहास.महाराष्ट्रात १३ लक्ष वर्षांपूर्वी मानववस्ती असल्याचे पुरावे मिळतात.महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती ३ ऱ्या शतकापासून मिळते त्याअगोदर च्या काळाला दंडकारण्य म्हणतात. त्यानंतर 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदर महाराष्ट्रत सत्ता
प्राचीन महाराष्ट्र इतिहास

* मौर्य राजवंश सत्ता :- इ.स.पू. ३२१-१८४ या काळात महाराष्ट्रचा कोकण भाग मौर्य साम्राज्याचा हिस्सा होतो.१८५ मौर्य साम्राज्य संपले त्यानंतर वेगवेगळे राजघराणे उदयास आले.

*सातवाहन राजवंश सत्ता :- महाराष्ट्रामधील पाहिले ज्ञात राजघराणे आणि त्यांचा सत्ता काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो.

*वाकाटक राजवंश सत्ता:- इ.स. २५० ते ५२५ या काळात विदर्भ व त्याजवळील परिसर यावर राज्य केले.अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी याच काळातील आहेत.


*कलाचुरींचा राजवंश सत्ता:- इ.स.६व्या शतकात काही भागात राज्य केले.


*चालुक्य राजवंश सत्ता:-इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत महाराष्ट्रात राज्य केले. चालुक्य हे सामंत होते.


*राष्ट्रकूट राजवंश सत्ता:- इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या काळात सत्ता होती.याच काळात अजिंठा वेरूळ येथील लेणी कोरण्यात आली.


*शिलाहार राजवंश सत्ता:-  इ.स. ९वे ते १३वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते.


*देवगिरीचे यादव राजघराणे:-  इ.स. ८५० - इ.स. १३३४ या काळात सत्ता होती.हे राजघराणे महाभारतकालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढऴतात. हे पहिले मराठी राज्य म्हणून उदयास आले.हे राज्य मध्ययुगातील महत्त्वाचे ठरते.


*खिलजी राजवंश सत्ता:- इ.स. 1296-इ.स. 1316 या काळात पहिल्यादा इस्लामी सत्ता होती.जलालुद्दीन ख़िलजी हे पहिले राजा होते पण अलाउद्दीन खिलजी ने त्यांचा खून केला आणि गादीवर बसला .हाच तो  अलाउद्दीन खिलजी यावर (movie)आला होता.
*तुघलक राजवंश सत्ता:- इस १३२४ मध्ये तुघलक घराण्याची सत्ता स्थापन झाली ती जास्त काळ महाराष्ट्रात टिकून राहिली नाही.


*बहमनी राजवंश सत्ता:- इस.१३१७-इस.१५१८ या काळात सत्ता होती.तुघलक निघुन गेला तेव्हा महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू झाला आणि त्यामध्ये हसन गंगू यशस्वी झाला. बहमनी घराण्याने पुढील १५० वर्षे महाराष्ट्रात सत्ता टिकून होती . त्यानंतर हे राज्य कमजोर झाले आणि त्यातून  इ.स. इस.१५१८ राज्याचे पाच भागात विभाजन झाले. अहमदनगराची ~ निजामशाही , विजापुरातील ~आदिलशाही, बीदरची ~ बरीदशाही, गोवळकोंड्याची ~ कुतुबशाही,  वऱ्हाडातील~इमादशाही त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागावर राज्य केले आणि त्याच्यामध्ये आपापसात सत्ता संघर्ष सुरू झाला.


*मराठा साम्राज्य भोसले घराणे:- बहमनी सत्ता विभाजन झाल्यामुळे पाच शहा मध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि त्याचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन केले. इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते.

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):