मराठा आरमार | Father of indian navy - chatrapati shivaji maharaj यांच्या विषयी माहिती

मराठा आरमार|Father of indian navy - chatrapati shivaji maharaj


List of content

  • आरमार म्हणजे काय?
  • आरमारची उभारणी / बांधणी 
  • आरमारातील जहाजाचे प्रकार
  • जहाजाची संख्या 
  • आरमाराची रचना आणि सैनिक 
  • आरमारामुळे स्वराज्यावर काय परिणाम झाला
  • छत्रपति शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?
  • भारतीय नौदल दिवस कोणता व का मानतो?

प्रिय वाचकांनो आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आरमार म्हणजेच मराठा आरमार या विषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण प्रथम जाणून घेऊया 

आरमार म्हणजे काय?

लढाऊ जाहजांचा समूह ,जहाजावरील योध्दे , अधिकारी,सैनिक सैनिक व जहाजावरील युध्दसामग्री या सर्वांस आरमार म्हणतात. 

               महाराष्ट्रात चार सत्ता( दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीऱ्याचा सिद्दी)हुकूमत गाजवत होत्या त्यामधे स्वराज्य स्थापन करणे मोठे अवघड होते पण आपल्या ताकतीच्या आणि बुध्दीच्या जोरावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले . छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्याने रायगड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला भिडली .


भारतीय नौदलाचे जनक |chatrapati shivaji maharaj
Father of indian navy 


आरमारची उभारणी / बांधणी 

 इ.स.१६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर आरमार उभारणीची सुरुवात केली. जहाज बांधणीचे तंत्र स्वराज्यात विकसीत नसल्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज जहाज बांधणारे कुशल कारागीर होते.रुय लैताव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी वीस लढाऊ गलबते बांधण्यास सुरुवात केली. छञपती शिवाजी महाराजांनी जाहीर केले की आम्ही फक्त सिद्दी विरुद्ध कारवाया करू .पण पोर्तुगीजाना वाटत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा धोका सिद्दीला तसेच आपल्याला ही होईल यामुळे वसईचा कॅप्टन आन्तोनियु द मेलु कास्त्रु (पोर्तुगीज ) याने आपल्या लोकांना नोकरी सोडून देण्यास सागितले.,परिणामी पोर्तुगीज लोक नोकरी सोडून गेले ,पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काम थांबवले नाही तर जे मराठी लोक पोर्तुगीज यांच्या सोबत काम करत होते. त्यांना संधी देऊन आपले काम सुरूच ठेवले.

आरमारातील जहाजाचे प्रकार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणत्या प्रकारचे जहाजे होती याची महिती जास्त मिळत नाही पण सभासद शिवाजी महाराज यांच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचे सांगतो.त्यात मचवे, बभोर, तिरकती पाल होते हा उल्लेख मल्हाररामराव चिटणीस करतो. 

जहाजाची संख्या 

कृष्णाजी सभासद -७००

मल्हार रामराव चिटणीस -४००ते ५००

चित्रगुप्त बखर -६८०

आरमाराची रचना आणि सैनिक 

आरमारमध्ये एक सुभा (विभाग) मध्ये पाच गुराब आणि पंधरा गलबताचा करावा ( रामचंद्र आमात्य) असे अनेक सुभा (विभाग) होते .या सर्व सुभा (विभाग) चे दोन भागांमध्ये विभाजन होते .एका विभागाचा प्रमुख मायनाक भंडारी आणि दुसऱ्या विभागाचा प्रमुख दौलतखान होते .आरमार प्रमुखाला दर्यासारंग ही पदवी होती . शिवाजी महाराजांनी जाणले होते की मराठी लोकांना जहाजविषयी जास्त माहिती नाही पण समुद्राची माहिती असलेले लोक आपल्या सैन्यामध्ये कोळी ,भंडारी भंडारी ,मलबारी मलबारी,ख्रिचन , मुस्लिम असे लोक घेतले .


आरमारामुळे स्वराज्यावर काय परिणाम झाला

स्वराज्याला समुद्रावर तीन मोठे शत्रु होते पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज.किनारपट्टीवरून घुसखोरी करणे धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,बायका पळवणे,लोक बाटवणे गुलाम करणे हे बंद झाले.पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज यांच्यावर जरब बसली आणि मराठा आरमाराची त्यांना भीती वाटू लागली.याचा प्रत्यय पोर्तुगीज खलाशी विजरई कोंदी द सांव्हिसेन्ति याने एका पत्रात व्यक्त केलेले मत उल्लेखनीय आहे. "शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते.कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासूनच कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधिले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत;पण ही तारवे मोठी नाहीत." 

        शिवाजीराजांच्या जमिनीवरच नाही तर समुद्रात सुद्धा आरमारमुळे दरारा वाढला होता . परकीय व्यापार करणे ,व्यापाऱ्यांना स्व'संरक्षण दिल्यामुळे कर द्यावा लागे .तसेच परकीय सत्तेला भीती वाटत होती त्यामळेच मराठा आरमार मधून जाताना त्यांच्या जहाजांना जकात(कर )द्यावा लागे.आणि सागरी युद्धाना सडेतोड जवाब मराठा आरमार देत असे .शिवाजी महाराजांनी आरमाराची शक्तिशाली आरमार उभारले पण संरक्षणासाठी काही किल्ले बांधले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा अनेक जलदुर्ग बांधले.त्यामुळे स्वराज्याच्या जनतेला रोजगरनिर्मिती झाली.

sindhudurg fort
sindhudurg fort


छञपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आरमार दल हा विचार तात्पुरता नसून हा जो पर्यंत पृथ्वी तालावर मानव आहे तोपर्यंत चालणार .प्रिय वाचकांनो यावरून स्पष्ट की आरमार दल यामुळे स्वराज्याचे स्व'संरक्षण झाले आणि लुटमार करणे ,घुसखोरी करणे याला आळा बसला इतकेच नाहीतर व्यापर करायला चलाना मिळली,लोकांना लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.आणि जे शत्रु स्वतःला समुद्राचे मालक समजत त्यांना त्यांची जागा दाखवली . पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज यांना मान्य करावे लागले की मराठा आरमार हे शक्तीशाली आरमार आहे .तर वाचकांनो आपण बघूया

छत्रपति शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?

छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या बंदोबस्तासाठी स्वराज्याच्या रक्षणासाठी दूरदृष्टी ठेवून आरमाराची स्थापना केली ,मध्ययुगीन भारतातील हे पहिले आरमार होय यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना father Of Indian भारतीय नौदलाचे जनक मानले जाते 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून प्रेरित असलेले भारतीय नौदलाचा ध्वज २ सप्टेंबर २०२२ रोजी बदल करण्यात आला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रचा आकार घेतला आहे. आपण फोटो मध्ये पाहू शकता ....


Indian Naval Ensign
Indian Naval Ensign

भारतीय नौदल दिन

3 डिसेंबर1971 रोजी पाकिस्तानने भारतीय विमान तळावर हल्ला केला यांचे प्रत्युत्तर म्हणून, निर्घाट, वीर आणि निपत या 3 क्षेपणास्त्र नौका कराचीच्या दिशेने सोडले. ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान, भारतीय नौदलाने 4 पाकिस्तानी जहाजे बुडवली . म्हणून 4 डिसेंबर दिवस भारतीय नौदल दिन मानला जातो.

 




SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):