वीर बाजीप्रभू देशपांडे एक पराक्रमी योद्धा veer Baji Prabhu Deshpand - Maratha Warriors

 वीर बाजीप्रभू देशपांडे

   छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाला मारले त्यानंतर पन्हाळ जिंकून घेतला त्यामुळे विजापूरचा आदिलशहा खूपच चिडला.आणि आदिलशहाने शिवरायांचा विनाश करण्यासाठी सिद्दी जौहरला आणि अफजलखानाच्या मुलाला म्हणजेच फाजलखान यालाही पाठवले होते.त्यांनतर लगेच सिद्दी जौहरने पन्हाळाला  वेढा घातला.शिवरायांनी खूप प्रयत्न केला पण वेढातुन काही सुटतं नव्हते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याने बाहेर पडण्याचे ठरवले .आणि त्या रात्री  छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या सज्ज केल्या एका पालखीत शिवाजीराजे आणि दुसऱ्या पालखीत त्यांच्यासारखा दिसणारा वीर शिव काशीद आणि दोन्ही पालख्या निघाल्या एक अवघड वाटेने आणि दुसरी गणिमाला दिसेल अशा वाटेने आणि ती पालखी पकडली.व वीर शिवा काशीद यांना ठार केले पण शिवा कशीद यांनी फार वेळ गणिमाला गाफील ठेवले.त्यानंतर सिद्दी जौहरने आपली हजारोचे सैन्य शिवाजीराजे यांच्या मागे लावले .आणि त्यानंतर शिवाजीराजे घोडखिंड पर्यत पोहचले.तोच सिद्दी जौहरचे सैन्याची चाहूल लागली.त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे समोर आले महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले राजे तुम्ही पुढे जा मी अडवतो खिंड.नाही तर सर्वच लढू नाही राजे लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे. त्यानंतर ३०० मावळे घोडखिंडीत थांबले आणि शत्रूचे सैन्य हजारोंच्या संख्येने होते.आपण कापले जाणार,मारणार पण तरीही लढणार. राज तुम्ही विशाल गडावर जा जो पर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही गनीम खिंड पार करणार नाही.आणि राजे निघाले विशाल गडाकडे.

veer Baji Prabhu Deshpand


       बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यासमोर मोठे आव्हान होते.शत्रू हजारोच्या संख्येने आणि  मावळे फक्त 300 च तसेच पन्हाळा गडापासून चिखल तुडवत घावत घोडखिंडीत कसेबसे पाहोचले होते .त्यामुळे मावळे खूपच दमले होते आणखी लढायचे म्हणजे खूप अवघड तरी लढायचे आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी.शत्रू घोडखिंडीत येऊन पोहोचला. आणि युद्ध सुरू झाले.मावळे व बाजीप्रभू देशपांडे हे दोन्ही हातात तलवारी घेऊन गणिमावर सपासप वार करत होते.मावळ्यांनी खिंड ६ते ७ तास लढवली आणि पराक्रम गाजवला.काही मावळे धारातीर्थी पडले सर्वत्र रक्त आणि जखमी झालेले बाजी स्वतःचे शरीर यांचेही भान नव्हते मनामध्ये एकच ''बाजी तोफे आधी न मरे सांगा मृत्यूला" त्या नंतर तोफेचे बार फुटले,आणि तृप्त मनाने खाली कोसळला आणि पुटपुटला- मी माझा शब्द पाळला. बाजी आणि मावळे स्वराज्यासाठी १३जुलै १६६० ला अमर झाले.बाजीप्रभू देशपांडे हे 

                  

                     श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।

                    म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ।।

              जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):